त्याचं काय झालं?

May 3, 2006 Mukund Bhalerao

काल पावसात येणार होतीस, त्याचं काय झालं?
मला साथ देणार होतीस , त्याचं काय झालं?

मला तुझं खरं वाटलं, येणार म्हणून बरं वाटलं.
वाट पाहिली ढसाढसा, शांत होतो जमेल तसा.
तरी घाव खोल गेला, सावरुनही तोल गेला.
हाती हात घेणार होतीस, त्याचं काय झालं?

माझी जबरदस्ती नाही, तू ही तेवढी सस्ती नाही.
तुझ्या अंगणाएवढी देखिल माझी सारी वस्ती नाही.
जाणीव होताच थिजून जातो, पेटता पेटता विझून जातो.
नेमका विझून जातेवेळी, मन थिजून जातेवेळी,
थोडी आग देणार होतीस, त्याचं काय झालं?

झालं गेलं विसरुन जा, वचन दिलं विसरुन जा.
मी तर काही बोलत नाही, तू जे केलं विसरुन जा.
आपलं आपलं बघू या, जमेल तसं जगू या.
पण…तुफान पिऊन जगण्यासाठी ,
मिळून स्वप्न बघण्यासाठी,
तुझे डोळे देणार होतीस, त्याचं काय झालं?

Entry Filed under: माझ्या कविता..

1 Comment Add your own

  • 1. Ranjani  |  May 29, 2006 at 10:16 am

    heart felt poem keep it up


Leave a Comment

Required

Required, hidden



Some HTML allowed:
<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Trackback this post  |  Subscribe to comments via RSS Feed

Pages

Categories

Calendar

May 2006
S M T W T F S
    Jun »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Most Recent Posts